View this post on Instagram
Viral Video : सोशल मीडियावर घरगुती उपाय सांगणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उपाय इतके भन्नाट असतात की पाहून कोणीही थक्क होईल. तुमच्या घरात झुरळं आणि पाली आहेत का? जर हो, तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की घरातून झुरळं किंवा पाली कशा पळवायच्या? पण टेन्शन घेऊ नका. सध्या एक असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका डांबर गोळीच्या मदतीने तुम्ही घरातील पाली किंवा झुरळं पळवू शकता. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
View this post on Instagram
या व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –
एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्या आणि हे पाणी गरम करा.
त्यानंतर त्यात एक डांबरगोळी टाका आणि त्याचबरोबर एक कापूरची वडी सुद्धा या गरम पाण्यात टाका.
जोपर्यंत ही डांबर गोळी पाण्यात विरघळत नाही, तोपर्यंत गॅस सुरू ठेवा.
गरम पाण्यात ही डांबरगोळी विरघळताना दिसते व पाण्याच्या वरती एक थर जमा होतो
डांबरगोळी विरघळल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी कोमट होण्यापूर्वी हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्यानंतर त्यात तीन ते चार चमचे तुम्ही जे वापरता ते लिक्विड फ्लोअर टाका आणि हा स्प्रे जिथे पाल येत असतील किंवा झुरळ दिसतील तिथे मारा.
१५ दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल.
फक्त स्प्रे मारताना स्वच्छता ठेवा.
View this post on Instagram
prajakta_salve_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डांबरगोळी गरम पाण्यात टाकताच चकित व्हाल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,” आम्ही नेहमी करतो हा प्रयोग” तर एका युजरने लिहिलेय, “याचा काहीही फायदा होत नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “नवीन प्रयोग सांगा.” प्राजक्ता साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून असेच घरगुती उपाय किंवा भन्नाट जुगाडचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये ते नवनवीन माहिती देतात. युजर्स सुद्धा त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर भरघोस प्रतिसाद देतात Viral Video.