काका किंग कोब्राला देत होते ठस्सन, विषारी सापाने काकांचा डोळा फोडला

 

View this post on Instagram

 

A post shared by Mike Holston (@therealtarzann)

सापांशी कधी मस्करी करू नका कारण ते कधी हल्ला करतील सांगता येत नाही. असा सल्ला सर्पमित्र वारंवार देतात. कारण सापांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. अन्यथा विषारी साप तुम्हाला कधी डसेल सांगता येत नाही. पण काही अतिउत्साही लोकं तज्ज्ञांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. अन् मग त्यांच्यासोबत काय घडतं हे आता तुम्हीच पाहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mike Holston (@therealtarzann)

 

एका काकांनी थेट किंग कोब्राला घाबरवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ ते त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहात होते. परिणामी साप बिथरला आणि त्यानं थेट काकांच्या डोळ्यावर हल्ला केला. पुढे या काकांचं काय झालं हे आता तुम्हीच पाहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mike Holston (@therealtarzann)

सापांचे डोळे हे माणसांसारखे काम करत नाही. कारण सापांनी समोरची दृश्य ही कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसतात. हा आता काही साप असेही आहेत ज्यांना हिरवा आणि निळा रंग दिसतो. पण ते फारच क्वचित आहेत. बरं, सापांना लांबी कळते पण रूंदी कळत नाही तसंच ते ६ फुटांपेक्षा लांब पाहू शकत नाही. कारण त्यांची दृष्टी ही द्विमितिय असते.
असो, पण हे सांगण्याचं कारण म्हणजे सापांना नियंत्रणात ठेवण्यासाठी ते तुमच्याकडे कुठल्या नजरेनं पाहताहेत हे लक्षात येणं गरजेचं आहे. पण लोकं एखाद्या मांजरीला पकडावं तसं पकडाया जातात आणि मग त्यांच्यावर हल्ला होतो. अन् असाच काहीसा अनुभव या काकांनी घेतला असावा.
हे काका बराच वेळ सापाकडे एक टक पाहात होते. दरम्यान साप बिथरला आणि थेट त्यांच्या डोळ्यांवर त्यानं हल्ला केला. पुढे या काकांचं काय झालं असेल हे काही वेगळं सांगायला नको. कारण सापाच्या दंशामुळे त्यांच्या डोळ्यांना चांगलीच इजा झालेली असणार. अगदी सापाचं विष काढलेलं असलं तरी डोळे हा नाजूक भाग आहे. डोळ्यांत साधं बोट गेलं तरी तो लाल येतो आणि इथे तर थेट सापानं हल्लाच केलाय.

Leave a Comment