अवघ्या २१ सेकंदात पळवले २३ लाखांचे दागिने; चोरीचा हा VIDEO पाहून गोंधळून जाल; पाहा नेमकं काय घडलं?

robber viral video गॉन इन ६० सेकंड्स हा हॉलिवूडचा चित्रपट अनेकांना आठवत असेल. ६० सेकंदात चोरी करण्याचा प्रसंग चित्रपटात दाखवला गेला आगहे. अशाच पद्धतीने गुजरातमध्ये एक चोरी झाली आहे. अहमदाबादच्या कृष्णा नगरमध्ये दिवसा ढवळ्या एक चोर महिलेच्या वेशात येऊन सोन्याच्या दुकानाबाहेरून २८ किलो चांदी पळवतो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अवघ्या २१ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये चोर येतो, बॅग हिसकावतो आणि क्षणाधार्त पळूनही जातो. ज्वेलर्सच्या बाहेरून दिवसाढवळ्या रस्त्यावर अनेक माणसं असतानाही ही चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

 

 

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चोराने महिलेचा वेश परिधान केलेला आहे. त्याने चेहरा साडीच्या पदरानं झाकलेला दिसतो. ज्वेलर्सच्या दुकानातील एक कर्मचारी दुकानाबाहेर चांदीने भरलेली बॅग घेऊन कुठेतरी जाताना दिसत आहे. मात्र दुचाकीवर बसलेला हा कर्मचारी फोनवर बोलण्यासाठी काही वेळ थांबतो. याच वेळेत चोर चोरी करून निघून जातो.

Leave a Comment